चालता चालता मोबाईल चार्ज करा

charger
मुंबई – दोन इलेक्ट्रोडस्मध्ये चिमटलेले क्रिस्टल वापरून साध्या पद्धतीने वीज निर्मिती केली जाते. या पद्धतीला पीझोइलेक्ट्रीक्स् म्हटले जाते. या पद्धतीत क्रिस्टल हलते किंवा थरथरते तेव्हा वीज निर्मिती होते. बर्थ डे कार्डात अशी लहान खेळण्यात हे तत्व वापरले जाते. त्याचा वापर करून फिलिपाइन्समधील १५ वर्षांच्या मुलाने बुटात एक साधे साधन बसवले आहे. आपण चालायला लागलो की त्यात वीज निर्मिती होते ती अगदी छोट्याशा साधनासाठी वापरता येते.

अँजिले कॅसिमिसे नावाच्या या मुलाने हे साधन विकसित केले आणि ते हाताने दाबून त्यात निर्माण झालेली वीज मोजली तेव्हा ती १५.०३ व्होल्ट एवढी दिसून आली. हेच साधन बुटाच्या सोलच्या खाली बसवून पायाने दाबले जाईल असे पाहिले. तेव्हा २७.८९ व्होल्ट वीज तयार झाली. या विजेचा वापर काही छोट्या कामांसाठी करता येतो असे दिसून आले.

हे साधन बुटात बसवून दोन तास बास्केट बॉल खेळलो तर त्यातून १० मिनिटे वीज प्रवाह वाहू शकतो आणि त्याच्या साह्याने मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करता येते. हे साधन बुटात टाकून फिरायला जावे म्हणजे छोट्या बॅटरीज् चार्ज करता येतील.

Leave a Comment