कल्पनेतील स्मार्टफोन म्हणून वर्णन करण्यात आलेला मोटोरोलाचा मोटो एक्स ६४ जीबी व्हर्जन यूएसमध्ये सादर करण्यात आले असून त्याची किंमत आहे ४४९ डॉलर्स म्हणजे २६५०० रूपये. मोटोरोलाने हा फोन लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली आहे आणि मोटो एक्स १६ व ३२ जीबी व्हर्जनपेक्षा हा फोन अधिक विकला जाईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
आधी वापरा, मग खरेदी करा- मोटो एक्ससाठी नवी स्कीम
हा फोन सादर करताना कंपनीने ८ व ९ जून या दोन दिवशी ट्राय अॅन्ड देन बाय म्हणजे आधी वापरा मग खरेदी करा ही विशेष योजनाही ग्राहकांसाठी खुली केली होती. केवळ दोन दिवसांसाठीच ही योजना होती आणि त्यात मोटो एक्स ६४ जीबी युजरने दोन आठवडे वापरून पसंत पडल्यास खरेदी करायचा होता. युजरला फोन खरेदी करायचा असेल तर मोटो एक्सच्या निवडक अॅक्सेसरीजवर ग्राहकाला ३० टक्के सूटही जाहीर करण्यात आली होती. मात्र फोन आवडला नसेल तर युजरने तो परत करायचा होता.
हा फोन ४.७ इंची डिस्प्ले, १० एमपीचा रियर र्कमेरा, २ एमपीचा फ्रंट कॅमेरा, एलइडी फ्लॅश, नो टच कंट्रोल, अॅक्टीव्ह डिस्प्ले अशा सुविधांनी परिपूर्ण आहे. भारतात तो या वर्षअखेरीपर्यंत लाँच केला जाईल असे सांगितले जात आहे मात्र कंपनीने त्याबाबत कांहींही खुलासा केलेला नाही.