सौरव गांगुली करणार आयपीएल फिक्सिंगची चौकशी

ganguly

नवी दिल्ली – आगामी काळात आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची चौकशी करणार आहे. या स्पर्धेतील चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्या.मुद्गल समितीवर गांगुलीची निवड झाली आहे.

या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुद्गल यांच्यासह तिघांचा समावेश आहे. ‘भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला आम्ही समितीमध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. या वेळी त्याने विनंती मान्य केली ’ असेही मुद्गल यांनी सांगितले.

त्यानमुळे गेल्यावर्षी झालेल्याा आयपीएलमधील स्पॉलट फिक्सिंगची चौकशी आता सौरव गांगुली करणार आहे. यामध्ये राजस्थालन रॉयल्सच्या तीन खेळाडूसह अनेक खेळाडूंचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता निपक्षपातीपणे करण्याची गरज आहे.

Leave a Comment