‘ब्राम्होस’ची यशस्वी चाचणी

bramaso
बालासोर – ब्राम्होस या क्षेपणास्त्राची कारवारच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. २९० कि.मी.पर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रात आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या युध्द सामर्थ्यामध्ये वाढ होणार आहे. ब्राम्होसने चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. अनेक वरिष्ठ लष्करी अधिका-यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. भारत आणि रशियाने संयुक्तरित्या या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. लष्कर आणि नौदलाने आधीच आपल्या क्षेपणास्त्र ताफ्यात क्षेपणास्त्राचा समावेश केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या ब्राम्होसला अधिक प्रभावी बनवण्यासाठी नेहमीच त्यामध्ये सुधारणा सुरु असतात.

Leave a Comment