बीएसएनएलचा भारत फोन अवघ्या १०९९ रूपयांत

bsnl
बीएसएनएलने सर्वसामान्य नागरिकांनाही इंटरनेट सेवेचा लाभ देणारा आणि ई गव्हर्नन्स एप्लिकेशनसाठी उपयुक्त असा फोन भारत फोन नावाने बाजारात आणली असून त्याची किंमत कुणालाही परवडेल अशी म्हणजे १०९९ रूपये आहे. इतक्या कमी किमतीतला हा फोन लो बजेट मोबाईल मार्केटमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरेल असे चेअरमन आर. के. उपाध्याय यांनी सांगितले.

बीएसएनएलने २०१३ मध्येही फिचर स्मार्टफोन सिरीज लाँच केली होती. २०१४ साली पेंटा कंपनीच्या सहकार्याने बीएसएनएलने पेंटा स्मार्टफोन व टॅब्लेट सिरीजही बाजारात आणली होती. नवा भारत फोन तीन इंची स्क्रीनसह आहे. त्याला ड्युएल सिम कार्ड दिले गेले असून तो मल्टीमिडीया फिचर फोन आहे. ६४ एमबीची इंटरनल स्टोरेज क्षमता असलेल्या या फोनसाठी १२०० मिनिटांचा टॉकटाईम मोफत दिला जाणार आहे. या फोनला १.३ एमपीचा रिअर कॅमेरा व जावा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या फोनवर हेल्थ केअर, टेलिकेअर, स्टिमिंग डेटा डिलिव्हरी व मोबाईल बँकींग सुविधाही देण्यात आल्या आहेत.

1 thought on “बीएसएनएलचा भारत फोन अवघ्या १०९९ रूपयांत”

  1. The landline must be working in order to talk. My 2 landlines at Tarapur Exchange are dead for last 2 years. No one is bothered in spite of various complaints in writing. Unless bribe is paid to line man the telephone does not work. The shameless BSNL is sending bills every month & expect us to pay .

Leave a Comment