फेसबुकच्या शेरिल सँडबर्ग भारत भेटीवर येणार

facebook
भारतातील लघु आणि मध्यम एन्टरप्रायझेसची प्रचंड क्षमता लक्षात घेऊन व्यवसायवाढीच्या संधींचा शोध घेण्यासाठी फेसबुक च्या सीओओ शेरिल सँडबर्ग जूनच्या शेवटच्या आठवड्यात प्रथमच भारत भेटीवर येणार आहेत. त्या प्रामुख्याने कंपनीचे मुख्यालय असलेल्या हैद्राबाद येथील स्मॉल अॅन्ड मिडियम एन्टरप्रायजेस प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर दिल्लीत त्या पंतप्रधान नरेंद मोदी यांनाही भेटणार आहेत. मोदीं सोशल मिडीयाचे मोठे सपोर्टर असल्याने सरकारी कार्यालयात सोशल मिडिया वापरासंबंधी त्या मोदींशी चर्चा करतील असे समजते.

फेसबुकचे अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक युजर असून ही संख्या १० कोटींवर आहे. भारत फेसबुकसाठी दोन नंबरचे मोठे मार्केट आहे. त्यामुळे व्यवसाय विस्तारासाठी येथील नवीन क्षेत्रांचा शोध फेसबुककडून घेतला जात आहे. त्यात जाहिरात क्षेत्र आणि एसएमई यांचा समावेश आहे. भारतात एसएमई क्षेत्रात २ कोटी ५० लाख छोट्या मोठ्या फर्म आहेत. त्या फेसबुक व्यवसाय वाढीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असे तज्ञांचे मत आहे. २०१४ च्या पहिल्या तिमाहीत फेसबुकच्या महसूलात २.५ अब्ज डॉलर्स इतकी वाढ नोंदविली गेली असून जाहिरातीतून २.२७ अब्ज डॉसर्लचा महसूल गोळा झाला आहे. ही वाढ ८२ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे त्यात मोबाईल जाहिरातींचा वाटा ५९ टक्के आहे.

सँडबर्ग भारत भेटीत कंपनीच्या डेव्हलपर बरोबरही चर्चा करणार आहेत. ही भेट कंपनीच्या मुख्यालयात हैद्राबाद येथे होईल असे समजते.

Leave a Comment