टोलप्रश्नी ‘राजदंड’ पळविल्याने सेनेचे आमदार निलंबित

mns
मुंबई – कोल्हापुरातील टोल प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घालताना चक्क राजदंड पळविण्याचा प्रकार केल्याने सेनेच्या दोन आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

राजेश क्षीरसागर आणि सुजित मंचेकर अशी निलंबित आमदारांची नावे आहेत. टोलच्या मुद्यावरुन सेना भाजपच्या आमदारांनी विधान सभेत गदारोळ घातला.

विधान भवनासमोर या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.यानंतर शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी विधानसभा गृहातील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

विधानसभेत गोंधळ घातल्या प्रकरणी आमदार राजेश क्षिरसागर आणि सुजित मंचेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबित आमदारांना सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीने बाहेर काढले.

Leave a Comment