खड्या भिंतीवर चढण्यासाठी विशेष हातमोजे

gloves
अमेरिकन डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने त्यांच्या झेड मॅन प्रकल्पातर्गत सैनिकांसाठी विशेष हातमोजे विकसित केले असून यामुळे सैनिक काचेसारख्या गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या उंच भिंतीही सहज चढून जाऊ शकणार आहेत. यासाठी विशेष प्रकारच्या कापडाचे या हातमोजांना कोटिंग केले जाणार आहे. गेको स्कीनसारखे हे कापड आहे. पालीच्या जातीतील प्रजातींच्या पंजांना अशा प्रकारचे चिकट कातडे असते व त्यामुळे कांही विशिष्ट प्रकारच्या पाली गुळगुळीत पृष्ठभागावरही सहज चढून जाऊ शकतात.

केंब्रिज मॅसेच्युसेट ड्रेपर लॅबोरेटरीतील संशोधकांनी हे हातमोजे तयार केले असून त्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यात २१८ पौड वजनाच्या व्यकतीने ५० पौंडांचे ओझे बरोबर घेऊन २५ फूट उंचीची काचेची खडी भिंत चढून दाखविली असल्याचे समजते. झेड मॅन या प्रकल्पांतर्गत वरील संस्था सैनिकांसाठी दोर्‍या अथवा शिड्या न वापरता उंच भिंती चढून जाण्यासाठी आवश्यक तंत्र आणि सामग्री विकसित करण्याचे काम करते.

Leave a Comment