कराची विमानतळावर दहशतवादी हल्ला -२३ ठार

karachi
कराची- पाकिस्तानातील कराची येथे जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री उशीरा १० ते १५ सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह २३ जण मृत्युमुखी पडले असून मृतांचा आकडा अधिक असावा असे सांगितले जात आहे. ठार झालेल्यात १० दहशतवाद्यांचाही समावेश आहे. या विमानतळावरच्या जुन्या टर्मिनलमध्ये विमानतळ सुरक्षा रक्षकांच्या पोषाखात असलेले दहशतवादी घुसले आणि त्यानी तेथेच अंदाधुंद गोळीबार सुरू केला असे समजते. या दहशतवाद्यांजवळ स्फोटकेही होती.

विमानतळाच्या फोकर इमारतीत दहशतवादी घुसल्याचे समजतात तातडीने लष्कराला बोलावण्यात आले आले तसेच पोलिसही हजर झाले. पोलिस आणि लष्करी जवानांनी दहशतवादी लपलेल्या इमारतीला गराडा घातला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात १० दहशतवादी मारले गेले तर एका पोलिस अधिकार्‍यासह कांही जवान ठार झाले. एक दहशतवादी अंगावर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट करून ठार झाला. हंगर परिसरात दीर्घकाळ ही चकमक सुरू होती. यात कोणत्याही विमानांचे नुकसान झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र या विमानतळवरून होणारी सर्व उड्डाणे रद्द केली गेली आहेत.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी आरपीजी रॉकेटसह आले होते. त्यांनी फेकलेल्या स्फोटकांमुळे ऑईल टँकरला आग लागून त्यांचा स्फोट झाला. दहशतवादी विमानतळावर घुसताच त्यांनी गोळीबार सुरू केला त्यामुळे त्यात कांही प्रवासीही ठार झाले असावेत असे सांगितले जात आहे. त्यासंबंधीची माहिती मिळू शकलेली नाही. पाच तास ही चकमक सुरू होती. हल्लयाची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे.

Leave a Comment