मुंडे यांच्या अस्थींचे १६ जूनला विसर्जन

munde4
मुंबई – भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन १६ जूनला राज्यातील विविध पवित्र ठिकाणी केले जाणार असल्याचे राज्याचे भाजप प्रवक्ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडे यांचा अस्थीकलश १४ व १५ जून रोजी अंतिम दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. व त्यानंतर १६ जूनला हरिहरेश्वर, नरसोबाची वाडी यासारख्या राज्यातील अनेक पवित्र स्थळांवर या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. ३ जून रोजी दिल्लीहून मुंबईकडे येत असताना मुंडे यांच्या कारला विमानतळ रस्त्यावर झालेल्या अपघातात मुंडे यांचे निधन झाले होते.

Leave a Comment