डेव्हिड व्हिलाच्या गोलमुळे स्पेंन विजयी

fifa2014

वॉशिंगटन- फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यायत डेव्हिड व्हिलाच्या दोन शानदार गोलच्या जोरावर स्पेनने सराव सामन्यात एल सॅल्व्हाडोरवर २-० अशी मात केली. या लढतीतील विजयासह स्पेनचा संघ विजेतेपद राखण्यासाठी ब्राझीलला रवाना होणार आहे. या सराव लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

फुटबॉल विश्वचषक स्पषर्धेतील सराव सामन्याात अॅ्टलेटिको माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करणा-या व्हिलाने ६०व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत स्पेनचे खाते उघडले. सामना संपण्यासाठी तीन मिनिटे असताना सुरेख गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सराव लढतीतील विजयासह स्पेनचा संघ विजेतेपद राखण्यासाठी आता ब्राझीलला रवाना होणार आहे. विश्वचषकात स्पेनची सलामीची लढत नेदरलॅण्डशी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्यात या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळेसच्याी विश्व चषक स्प र्धेतील विजेता म्हणून स्पेनकडे पाहिले जात आहे.

Leave a Comment