वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात

hockey

हेग : वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने भारताने मलेशियाचा ३-२ असा पराभव करून वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत आपला विजय नोंदवला, पण साखळी स्पर्धेतच भारतीयाचे आव्हान आटोपले आहे.त्यामुळे सामना जिंकूनही भारताला पुढील फेरीत जाता आलेले नाही.

अ गट साखळीच्या इतर लढतीत गतवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ५-० असा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बेल्जियमने स्पेनवर ५-२ असा विजय संपादला आणि इंग्लंडसह आपल्या बाद फेरीतील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ब गटाच्या शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत यजमान नेदरलँडसने माजी विजेत्या जर्मनीचा १-० असा पराभव केला.जर्मनीवर साखळीतच गारद व्हायची आपत्ती ओढवली आहे. नेदरलँड्सचा संघ ९ गुणांनिशी अव्वल स्थानावर आहे.

भारताने मलेशियावर ३-२ असा विजय मिळवला. १५ व्या मिनिटाला जसजीतसिंग खुलरने गोल करून भारताचे खाते उघडले. मध्यंतराला भारताकडे १-० अशीच आघाडी होती. ४६ व्या मिनिटाला रहिमने गोल करून मलेशियाला बरोबरी साधून दिली. ४९ व्या मिनिटाला आकाशदीपने गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली तर यानंतर दोनच मिनिटांनी आकाशदीपनेच भारताचा तिसरा व स्वतःचा दुसरा गोल केला. सामना संपायला नऊ मिनिटे बाकी असताना मरहान जलिलने मलेशियाचा दुसरा गोल सामना केवळ चार मिनिटं बाकी असताना केला पण नंतर मात्र मलेशियाला गोल करता आला नाही.

Leave a Comment