मेट्रो अखेर मार्गावर

metro
मुंबई – अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली वर्सोवा -अंधेरी- घाटकोपर या मार्गावरील मुंबई मेट्रो रेल्वे सेवा अखेर सुरु झाली . मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पहिली मेट्रो ट्रेन वर्सोवा येथून घाटकोपरच्या दिशेने रवाना झाली. मेट्रोच्या रुपाने मुंबईकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मेट्रोच्या उदघाटनानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मेट्रो रेल्वेच्या उदघटनाचा दिवस हा मुंबई शहरासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक अडचणींवर मात करत मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यात यश आल्याने खूप समाधान वाटत आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात मेट्रो प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर हे १२ किमीचे अंतर अवघ्या २१ मिनिटांत कापणार आहे. त्यामुळे रोजच्या लोकलच्या गर्दीतून दिलासा मिळण्यापेक्षाही पूर्व-पश्चिम उपनगरांसाठी आणखी एक ‘सेतू’ आणि बेभरवशाच्या बेस्टवर अवलंबून राहणे काही अंशी तरी कमी होणार आहे. त्याचबरोबर, जगातील अनेक मोठया आणि भारतातील मोजक्याच शहरांच्या बरोबरीने आता मुंबईतील मेट्रो ओळखली जाईल.

Leave a Comment