चांगली कामगिरी करून सेहवाग, भज्जीला वगळले

sehwag

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या‍ आयपीएल स्पर्धेत काही भारतीय खेळाडूनी चांगले काम केले.पण त्याना नुकत्याच निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला नाही त्यामुळे आगामी काळात बांगलादेश आणि इंग्लंडच्या दौ-यावर जाणा-या टीम इंडियामध्ये स्टार फलंदाज विरेंद्र सेहवागला व हरभजनसिंग या दोघांना वगळण्‍यात आले आहे.

या दौ-यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. त्या संघामधून सेहवाग, हरभजसिंगची निवड देखील करण्यात आली आहे. निवड समितीच्या या निर्णयाबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनसारख्या सीनियर खेळाडूंची भारतीय संघाला आता गरज नाही का, की या खेळाडूंना आता फॉर्मात आल्याचे अजूनही काही पुरावे द्यावे लागणार आहेत, असेच अनेक प्रश्न आहेत. मात्र, निवड समितीच्या या चुकीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फॉर्मात पुनरागमन करणा-या या खेळाडूंना खेळण्याची कोणत्याही प्रकारची संधीच निवड समितीने दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

सीनियर क्रिकेटपटूंनी मोठय़ा स्पर्धेत खेळी करून आपली जबाबदारी पार पाडावी, असा तर्क युवा खेळाडू बांधतात. युवा खेळाडू जोश व उत्साहाने परिपूर्ण आहेत, यात कोणतीही शंका नाही. मात्र, आम्हाला सीनियर खेळाडूंच्या अनुभवाचाही विचार करायला हवा. याच सीनियर खेळाडूंच्या अनुभवाच्या बळावर टीमने विजय मिळवल्याची अनेक उदाहरणे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आहेत. त्यावमुळे सेहवाग व हरभजनचा समावेश न करण्यात आल्याने आश्चय्र व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment