मोदी हे सुद्धा कॉंग्रेसच्या तिकिटावर हरले असते

sanjaynirupam_1
मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात इतके वाईट वातावरण तयार झाले होते की, नरेंद्र मोदी हे कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले असते तर हरले असते इतका लोकांना कॉंग्रेस पक्ष नकोसा झाला होता, असे विश्‍लेषण कॉंग्रेसचे मुंबईतील पराभूत खासदार संजय निरुपम यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

श्री. संजय निरुपम यांनी पुण्यातील मुस्लीम युवकाच्या हत्येचा संदर्भ घेऊन भारतीय जनता पार्टीवर टीका केली. भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या आधी जातीय भावना वाढवत नेते, ती भाजपाची कार्यशैलीच झालेली आहे असे ते म्हणाले. म्हणूनच पुण्यातल्या मुस्लीम तरुणाची हत्या जाणीवपूर्वक आणि योजनापूर्वक केली गेली आहे, असा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगरमध्ये अशाच पद्धतीने भाजपाने दंगलींना प्रोत्साहन दिले आणि हिंदू-मुस्लीम मतभेद वाढवले असे प्रतिपादन करून संजय निरुपम यांनी भाजपाच्या या कारस्थानांमुळे कॉंग्रेस पक्ष चिंतेत आहे, असे सांगितले.

Leave a Comment