इंटरव्ह्यू सोपा असतो

interview
नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार नेहमी मुलाखतीचे म्हणजे इंटरव्ह्यूचे टेंशन घेऊन जगत असतात. खरे म्हणजे ही मुलाखत एवढा ताण पडावा अशी नसते. मात्र इंटरव्ह्यू म्हणजे नेमके काय याबाबत विद्यार्थी आणि नोकरेच्छू उमेदवार अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना तणाव येतो. तणाव आला की नेमक्या मुलाखतीच्या वेळी त्यांचा आत्मविश्‍वास डळमळीत होतो आणि मुलाखतीमध्ये नेमका आत्मविश्‍वासच प्रामुख्याने पाहिला जात असल्यामुळे ही मुले इंटरव्ह्यूमध्ये नापास होतात. अशा अवस्थेत इंटरव्ह्यूला जाणार्‍या मुलांना पहिल्याच एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देता आले नाही की तो गडबडून जातो आणि त्याचा इंटरव्ह्यू कोसळतो. तेव्हा मुलाखतीमध्ये लक्षात ठेवावयाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाखतीला आत्मविश्‍वासाने सामोरे गेले पाहिजे आणि एखादे प्रश्‍नाचे उत्तर देता आले नाही तर आपण अपात्र ठरतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे.

मुलाखत घेणारे पॅनलमधील लोक विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर दिलेच पाहिजे अशी अपेक्षा बाळगत नसतात. जगातली सगळीच माहिती सगळ्यांना नसते. त्यामुळे एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर दिले नाही तर त्यात काही ङ्गार बिघडत नाही. ही गोष्ट मुलाखत देणार्‍यानेही लक्षात ठेवली पाहिजे आणि एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देता येत नसेल तर तसे नम्रपणे सांगितले पाहिजे. मुलाखत देणार्‍या मुलांच्या मनामध्ये सरप्राईज प्रश्‍नांची ङ्गार भीती असते आणि अशा प्रश्‍नांच्या बाबतीत अनेक लोक अनेक प्रकारच्या हकीकती सांगत असतात. त्या हकीकतीतले प्रश्‍न मोठे गंमतीशीर असतात आणि त्यांची योग्य उत्तरे देणारा उमेदवार हा कमालीचा हजरजबाबी असावा लागतो. मात्र हे सगळे हकीकतीत असते. प्रत्यक्षात मुलाखतीमध्ये ङ्गार कमी वेळा किंबहूना अपवादात्मक वेळाच सरप्राईज प्रश्‍न विचारले जात असतात आणि त्यांची उत्तरे देता आली नाहीत तर उमेदवारांना अपात्र ठरवले जात नसते.

प्रत्यक्षात नोकरीसाठीची मुलाखत ही सामान्यत: उमेदवारांमध्ये तीन प्रकारच्या पात्रता तपासण्यासाठी घेतलेली असते. पहिली पात्रता म्हणजे तो ज्या नोकरीसाठी मुलाखत द्यायला आलेला आहे. त्या नोकरीची आणि ज्या संस्थेत ती नोकरी आहे त्या संस्थेची नीट माहिती घेऊन आलेला आहे की नाही? अनेकवेळा अनेक उमेदवार संस्थेची आणि नोकरीची ङ्गार तपशीलात माहिती न घेताच अर्जही करतात आणि मुलाखतीलाही आलेले असतात. म्हणून मुलाखत घेताना पॅनलवरील ज्येष्ठ अधिकारी उमेदवाराला कंपनी आणि नोकरी या विषयी माहिती विचारत असतात. कारण त्याला त्या नोकरीची आवड आहे की नाही आणि त्याला त्याच क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे की नाही हे त्यांना तपासून बघायचे असते. दुसरी पात्रता तपासली जाते ती म्हणजे तांत्रिक क्षमता. ज्या कामासाठी अर्ज केलेला आहे त्या कामाचे कौशल्य त्या उमेदवाराकडे आहे की नाही याचा शोध कंपनी घेत असते. कारण ती पात्रता सर्वाधिक महत्त्वाची असते. त्यामध्ये त्या कामाची आवड आणि आवश्यक ते कौशल्य या दोन्ही गोष्टी तपासून पाहिल्या जातात.

तिसरी गोष्ट म्हणजे सदर उमेदवार नोकरी दिल्यास आपल्या संस्थेत किती वर्षे टिकेल हेही कंपनीला पाहायचे असते आणि तसे काही प्रश्‍न विचारले जात असतात. मुलाखतीला जाताना या संबंधात कोणते प्रश्‍न विचारले जातील आणि त्यांची आपण काय तयारी केली आहे. याचा विचार करून जायला पाहिजे. नोकरीसाठीची मुलाखत म्हणजे उमेदवाराचे मार्केटिंग असते. स्वत:चे चांगले गुण दाखवून देणे हे त्याचे कर्तव्य असते. त्यामुळे जाताना व्यवस्थित कपडे घालून गेले पाहिजे. आपली प्रमाणपत्रे ज्या ङ्गायलीमध्ये लावलेली असतील ती ङ्गाईल व्यवस्थित लावलेली असावी. आपण केलेला अर्ज नेमका काय केलेला आहे आणि अर्जात आपण काय म्हटलेले आहे हेही उमेदवाराला चांगले माहीत असावे कारण मुलाखत घेणार्‍या पॅनलवरील मंडळी आपल्या अर्जाची ङ्गाईल समोर घेऊन त्या अर्जाच्या अनुरोधाने प्रश्‍न सुरू करत असतात. म्हणजे आपण नेमका काय अर्ज केला आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment