राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द; पण १ हजारांचा दंड

rajthakeray
कल्याण – परप्रांतीयांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे ;मात्र त्यासाठी ठाकरे यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे.

२००८ साली रेल्वे बोर्डाच्या परिक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याना, कल्याण-डोंबिवली मधील विविध परीक्षा केंद्रावर मारहाण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात १६ जणांना त्यावेळी ५ दिवसांची पोलिस कोठडी झाली होती.याप्रकरणाच्या सुनावणीसाठी मात्र राज ठाकरे एकदाही न्यायालयात हजर राहिले नव्हते .त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते.अखेर आज राज ठाकरे यांनी स्वत: न्यायालयात हजेरी लावली. १ हजार रुपयांचा दंड भरुन राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

Leave a Comment