मोहम्मद शमी करणार लवकरच विवाह

shami

मुरादाबाद- टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा क्लीन बोल्ड झाला आहे. शमीला कोलकाता येथील एका मॉडलने बोल्ड केले आहे. टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज शमी व कोलकाताची मॉडेल यांचा विवाह समारंभ दिल्ली रोडवरील हॉटेल डे रीजेंसी मध्ये आयोजित करण्यात आला होता.

या विवाह समारंभात लाल पटक्यामध्ये सजलेला शमी लाल जोडयामध्येे खूप सुंदर दिसत होता. हा विवाह समारंभ साध्या पध्द‍तीने पार पडला. यामध्ये टीम इंडियामधील शमीचे कोणतेच सहकारी सहभागी झाले नव्हते. शमीचे वडिल तौफीक अहमद यांनी काही जवळच्या नातेवाईकांना आमत्रंण दिले होते. विवाहानंतर कोलकाता येथे रिसेप्शन समारंभ आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी सर्वांना निंमत्रीत करण्यात येणार आहे.

या रिसपेशन समारंभाला कैबिनेट मंत्री महबूब अली, राज्यमंत्री कमाल अख्तर, महापौर बीना अग्रवाल, बिलारीचे आमदार हाजी इरफान, एसपी एसके बघेल आदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शमीला अर्शिवाद दिले. कोलकाता येथील बड़े ट्रांसपोर्टर मुहम्मद हसन यांची मुलगी हसीना हिच्यासोबत क्रिकेटर शमीची जवळीकता वाढली होती. यामुळे त्‍याने विवाहाचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment