मेट्रो तिकीटदरात वाढ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री

metro_0
मुंबई – मुंबई मेट्रो रेल्वेच्या उदघाटनाचा मुहूर्त निश्चित झालेला असला तरी तिकीटदरावरून सरकार आणि रिलायन्समध्ये वाद निर्माण झाला आहे ,प्रकरण न्यायालयात गेले आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोची तिकीटदर वाढ होऊ देणार नाही असे स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने मेट्रोच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकार आणि रिलायन्समध्ये अजूनही तिकीटाच्या दरांवरुन वाद सुरु आहेत.रिलायन्सने परस्पर केलेली तिकीट दरवाढ राज्य सरकारला अजिबात मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीत तिकीटाचे दर तेरा रुपयांवरुन ४० रुपये होऊ देणार नाही. कायद्यानुसारच तिकीट दर आकारावे लागतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी रिलायन्सला ठणकावून सांगितले. त्यामुळे उद्या होणा-या मेट्रोच्या उदघाटनामध्ये राज्य सरकारचा कितपत सहभाग राहील याविषयी साशंकता आहे.

Leave a Comment