ब्राझील- अर्जेटिनात होणार फुटबॉल वर्ल्डकपची फायनल

fifa

ब्राझील- फुटबॉल वर्ल्डकप जसा जसा जवळ येत आहे. तशी तशी रंगत वाढत चालली आहे.आतापासूनच फुटबॉलच्या फायनलमध्ये कोणते संघ बाजी मारणार यासाठी आतापासूनच तर्कवितर्क लढविले जात आहेत.आगामी काळात ब्राझील आणि अर्जेटिना यांच्यात फुटबॉल वर्ल्डकपची अंतिम लढत रंगेल,असे दस्तुरखुद्द ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फिलिप स्कोलारी यांना अंदाज व्यक्त केला आहे.

दक्षिण अमेरिकेतील दोन दिग्गज संघ असलेल्याी ब्राझील आणि अर्जेटिना हे दोन संघ अंतिम फेरीत आल्यास फायनलचा आनंद जगभरातील फुटबॉलप्रेमींना घेता येईल.अर्जेटिना पहिल्या किंवा दुस-या राउंडमधूनच स्पर्धेबाहेर पडलेला मला पाहायला आवडणार नाही. अर्जेटिना वर्ल्डकपमधील नेहमीप्रमाणे वर्चस्व राखून खेळ करेल, अशी मला अपेक्षा आहे. जोडीला माझा संघ ब्राझीलदेखील कोणत्याही स्थितीत अंतिम फेरी गाठावा इतकेच मला हवे आहे,’’ असे स्कोलारी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

ब्राझीलमध्ये सध्या संप, निदर्शने, स्टेडियमची अपुरे राहिलेली कामे असा विविध कारणांमुळे तणाव आहे. तरी त्यांनी कसलीच चिंता नसल्याचे ‘फिफा’ने स्पष्ट केले आहे. ठरल्याप्रमाणे १२ जूनला कोणत्याही अडचणीशिवाय वर्ल्डकप सुरू होणार,याची आम्हाला खात्री आहे. उर्वरित दिवसांमध्ये आम्हाला कोणत्याही चिंता करायच्या नाहीत,’ असे फिफाचे सरचिटणीस जेरोमी वाल्के यांनी सांगितले. दरम्यान, साओ पावलोतील मेट्रो रेल्वे सबवेतील कर्मचा-यांनी बेमुदत संप स्वीकारला असला तरी परदेशी फुटबॉलप्रेमींचे स्वागत करण्यास सज्ज आहोत,असे ब्राझीलचे क्रीडामंत्री अल्डो रेबेलो यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment