फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नदाल-जोकोविच आमने-सामने

nadal

पॅरिस – फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये स्पेनचा रफाल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांची जोडी पोहचली आहे. त्यायमुळे आगामी काळात फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत नदाल-जोकोविच यांच्यात सामना रंगणार आहे. अव्वल मानांकित नदालने एकेरीच्या उपांत्य फेरीत ब्रिटनच्या अँडी मरेवर, तर द्वितीय मानांकित जोकोविचने लॅटव्हियाच्या एर्नेस्टस गुल्बिसवर मात केली. त्यामुळे आता या दोन दिग़गजांच्या् लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फ्रेंच ओपन टेनीसच्याज पहिल्या उपांत्य सामन्यात जोकोविचने अठराव्या मानांकित गुल्बिसवर ६-३, ६-३, ३-६, ६-३ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.आता जोकोविचला वेध लागले आहेत, ते करिअर ग्रँड स्लॅमचे. रविवारी होणा-या अंतिम लढतीत जोकोविचने नदालला हरवून जेतेपद मिळवल्यास करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा जोकोविच आठवा टेनिसपटू ठरेल.

यापूर्वी अमेरिकन ओपन जोकोविचने २०११ मध्ये जिंकली आहे. मात्र, अद्याप त्याला फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवता आलेले नाही. आता या स्वप्नपूर्तीसाठी त्याला नदालचा अडथळा पार करावा लागणार आहे. दुस-या उपांत्य लढतीत नदालने सातव्या मानांकित अँडी मरेवर ६-३, ६-२, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. नदालचा हा मरेवर १५वा विजय आहे. क्ले कोर्टवर मरेला एकदाही नदालला पराभूत करता आले नाही. २०११च्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत नदालनेच मरेचे पॅकअप केले होते. त्या लढतीची आठवण पुन्हा ताजी झाली. फ्रेंच ओपनमधील नदालची घोडदौड कायम असून, त्याचा ६५वा विजय आहे

Leave a Comment