नौदलाच्या ताफ्यात ‘अचूक-अग्रीम’

arun
मुंबई – सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नौदलाच्या ताफ्यात ‘अचूक-अग्रीम या दोन अत्याधुनिक नौका संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते सामील झाल्या मुंबईच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या दोन अत्याधुनिक नौकामुळे गस्त आणखीन अचूक होणार आहे.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज या नौकांचं उदघाटन केले . मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नौदलाकडून 20 अत्याधुनिक नौकांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी चार नौका यापूर्वीच नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत.त्यात या दोन नौकांची भर पडली आहे यामुळे सागराची गस्त घालण्यास मदत होणार आहे. अजून उर्वरीत नौका तीन महिन्याच्या टप्प्याने नौदलात दाखल होणार आहेत. या अत्याधुनिक नौका असून त्यांच्यावर 5 अधिकारी 34 कर्मचारी असणार आहे . दरम्यान संरक्षणमंत्र्यांनी आयएनएस सिंधुरक्षकची पाहणी केली.

Leave a Comment