टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा खडतर

teamindia

मुंबई – आगामी काळात टीम इंडियासाठी इंग्लंडचा दौरा खडतर ठरणार आहे.या दौ-यावेळी टीम इंडियाला काही खडतर गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. टीम इंडियाची गोलंदाजी ताकतवर नसल्याने इंग्लंडमधील कसोटीत दोनदा बाद करणारे २० विकेट काढणारे गोलंदाज आपल्याकडे आहेत कुठे असा सवाल भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरने केला. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियाला करावा लागणारा हा दौरा सत्वपरीक्षा पाहणारा आहे.

याबाबत बोलताना दिलीप वेंगसरकर म्हणाले, टीम इंडियाचे प्रमुख गोलंदाज भुवनेश्वरकुमार, महमद शमी, वरूण एरॉन यांच्या गाठीशी मिळून जेमतेम १३ कसोटींचा अनुभव आहे. तर नव्याने संघात समावेश करण्यात आलेल्या राजस्थानी पंकजसिंग, मध्यप्रदेशचा इशांत पांडे आणि कर्नाटकी स्टुअर्ट बिन्नी यांना अजून कसोटीचा टिळा लागलेला नाही. टी २० आणि वनडे क्रिकेटवर पोसलेली ही नवोदितांची पिढी इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायला जात आहे.

तब्ब्ल ५५ वर्षांनी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळायला जातो आहे. अॅशेस मालिकाच अलीकडे पाच कसोटींची असते इतरत्र मात्र तीन किंवा चार कसोटींवरच भर असतो. पाच दिवसांचे कसोटी सामने जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्याची क्षमता गोलंदाजांमध्ये असावी लागते. ते कोण करणार असा सवाल करून दिलीप वेंगसरकार यांनी उपस्थित केला. चार गोलंदाजांचा जरी टीम इंडियाने समावेश केला तर आपण मैदानात उतरतो आणि यापैकी दोघांकडे १० विकेटस काढण्याची क्षमता असायला हवी आणि असा गोलंदाज यात मला तरी दिसत नाही,असेही तो यावेळी म्हणाला.

Leave a Comment