मोदींच्या भेटीबाबत अमेरिकेची सारवासारव

modi4
वॉशिंग्टन – जपानच्या दौऱ्याला प्रथम प्राधान्य दिल्याने अमेरिका गडबडली आहे. इभ्रत वाचविण्यासाठी मोदींची भेट निश्चित आहे पण वेळापत्रक ठरलेले नाही,त्यामुळे त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधी अमेरिका प्रवेशबंदी घालणाऱ्या अमेरिकेने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होताच त्यांना अमेरिका भेटीचे आमंत्रण धाडले आहे;पण भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांना व्हिसा मान्य केला आहे,या पार्श्वभूमीवर मोदी हे अमेरिकेला जाणार आहेत मात्र त्याआधी त्यांनी आशिया खंडात बलाढ्य असलेल्या जपान दौ-याला प्राधान्य देवून अमेरिकेला अप्रत्यक्ष चपराक लगावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी जपानचे पंतप्रधान शिनझो अ‍ॅबे याच्याकडून औपचारिक भेटीचे निमंत्रण मिळाले. येत्या जुलै महिन्यात मोदी जपान दौ-यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.जपानला प्रथम प्राधान्य दिल्याने अमेरिकेच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारी हार्फ म्हणाले, नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित असले, तरी या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. वेळापत्रकाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व परराष्ट्रसचिव जॉन केरी यांच्याशी चर्चा झाली आहे. मोदींचे आम्ही वॉशिंग्टनमध्ये स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.