महाराष्ट्रात शेंद्रा आणि गुजराथेत धोलेरा हायटेक शहरे होणार

shendra
केंद्र सरकारच्या मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर योजनेअंतर्गत देशात जी हायटेक शहरे उभारली जात आहेत, त्यातील पहिली दोन शहरे महाराष्ट्रात औरंगाबादजवळच्या शेंद्रा इथे आणि गुजराथेत धोलेरा येथे उभारली जात असल्याचे दिल्ली -मुंबई औद्योगिक कॉरिडॉर विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या दोन शहरांच्या उभारणीसाठी ६ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना डीएमआयसी चे सीईओ तल्लीनकुमार म्हणाले की २०० चौरस किलोमीटरच्या या परिसरात पाच औद्योगिक केंद्रे उभारली जाणार आहेत. रेल्वे, रस्ते, बंदरे आणि विमान वाहतूकीची सुविधा त्यासाठी पुरविली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून औद्योगिक केंद्रांजवळ हायटेक शहरे निर्माण केली जात आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी प्रचंड प्रमाणावर वाढणार आहेत. यातील पहिली दोन शहरे शेंद्रा आणि धोलेरा येथे उभारली जात असून तेथे पुढील वर्षांपासून बांधकामाला सुरवात होणार आहे.

या उभारणीत राज्य आणि केंद्राचा ५०-५० टक्के वाटा आहे. शेंद्रा शहर ४० चौरस किलोमीटर परिसरात तर धोलेरा शहर २२ चौरस किलोमीटर परिसरात उभारले जात आहे. राज्य सरकार त्यासाठी जमीन देणार आहे. वर्षाच्या अखेरी आणखी तीन हायटेक शहरांच्या उभारणीचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यात ग्रेटर नॉयडा, ग्लोबल सिटी गुरगांव आणि विक्रम उद्योगपुरी यांचा समावेश आहे. यामुळे परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे तसेच जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांचाही मोठा फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.

2 thoughts on “महाराष्ट्रात शेंद्रा आणि गुजराथेत धोलेरा हायटेक शहरे होणार”

  1. आपल्या प्रतीकीये बद्दल धन्यवाद.

Leave a Comment