‘आप’ला धास्ती ;अजित सावंतांना नोटीस

ajitsawant
मुंबई – सध्या आम आदमी पक्षाचे दिवस इतके खराब आले आहेत की पक्ष राहील कि नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे, खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे जागे झाले असले तरी पक्षात सामुहिक नेतृत्व निर्माण होऊ नये याचीच काळजी घेतली जात असल्याचे अजित सावंत यांना पाठविलेल्या नोटीसीमुळे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसमधून आम आदमी पक्षात प्रवेश केलेले नेते अजित सावंत यांना पक्षानं नोटीस पाठवली आहे.पण त्यामागे कारणही तसे वेगळे आहे.

‘आप’ला सावंतांची धास्ती वाटत आहे, का तर ते जी भूमिका माध्यमांमध्ये मांडतील त्यावरून ते प्रवक्ते असे चित्र निर्माण होईल. असे पक्षाला वाटत आहे. आम आदमी पक्षामध्ये सध्या पक्षांतर्गत वादाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आधी योगेंद्र यादव, नंतर अंजली दमानिया यांच्या रुपाने पक्षातील वाद चव्हाट्यावर आले. आता लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसमधून आम आदमी पक्षात प्रवेश केलेले नेते अजित सावंत यांना पक्षानं नोटीस पाठवली आहे. प्रसार माध्यमांशी बोलण्यासही त्यांना मनाई कऱण्यात आली आहे. सावंत प्राथमिक स्तरावरील नेते असून त्यांच्या बोलण्यातून आपचे प्रवक्ते असल्याचं चित्रं निर्माण होतं आहे असा दावा आपने केला आहे. त्यामुळे आता प्रसार माध्यमांमध्ये आपची बाजूची मांडण्यास सावंत यांना विरोध करण्यात आला आहे.

Leave a Comment