सराव सामन्यात इंग्लंड-इक्वेडरची बरोबरी

brazil

ब्राझील : गेल्या काही दिवसांपासून आता फुटबॉलचा ज्वार दिसून येत आहे. फुटबॉल वर्ल्डकपचे साखळी सामने होण्यापूर्वी संघाना सराव करता या म्हणून सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सराव सामन्यात इंग्लंड संघाची लढत तुलनेने दुबळ्या इक्वेडर संघाविरुद्ध झाली. हा सामना त्याने २-२ अशा बरोबरीत सोडल्याने इंग्लंड संघाचा घाम निघाला होता. यावेळी झालेल्या अन्य लढतीत गत उपविजेते हॉलंड आणि उरुग्वे यांनी आपापले सामने सहज जिंकले.

या सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने हल्लाबोल करून २-० अशी मजबूत आघाडी घेत चाहत्यांना खुश केले. २९ व्या मिनिटाला वॅन रुनीने आणि ५१ व्या मिनिटाला रिकी लँमबर्ट यांनी गोल करून इक्वेडरला जबरदस्त धक्का दिला. पण, या धक्क्यातूनही स्वत:ला सावरत इक्वेडरने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात इंग्लंडचा घामटा निघाला. मायकल अरोयो आणि एनेर वैलेंसिया यांच्या प्रत्येक एका गोलने सामना २-२ असा बरोबरीत आणला.

इक्वेडरच्या या हल्ल्याने गांगरलेल्या इंग्लंडला काय करावे हेच सुचत नव्हेत.त्यांचा प्रत्येक वार हा चोख पद्धतीने परतवला जात होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी याची घुसमट बाहेर निघाली आणि ७९ व्या मिनिटाला या दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार सर्वानी अनुभवला.इक्वेडरचा खेळाडू अॅटोनिओ वेलेन्सी याच्याकडून चेंडू हिसकावण्याच्या नादात रहिम स्टर्लिगने त्याच्या पायात कैची घातली.याने रागावलेल्या वेलेन्सीआने स्टर्लिगवर हात उगारला आणि क्षणात वातावरण तापले.पंचांनी या दोघांनाही रेड कार्ड दाखवून बाहेरचा रस्ता दाखवला.

Leave a Comment