रशियावर निर्बंध घालण्याचा पश्चिमी राष्ट्रांचा इशारा

punit
युक्रेनला अस्थिर करण्याचे रशियाकडून होत असलेले प्रयत्न ताबडतोब थांबले नाहीत तर रशियावर आणखी नियंत्रणे लादली जातील असा इशारा पाश्चिमात्य राष्ट्रप्रमुखांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांना दिला आहे. युक्रेनमध्ये उद्भवलेल्या पेचप्रसंगानंतर हे सर्व नेते प्रथमच एकत्र आले असून जी सात गटाची बैठक या आठवड्यात होत आहे.

युक्रेनमध्ये २५ मे रोजी अध्यक्षीय निवडणक झाली आहे आणि पेट्रो पोरोशेन्को हे युक्रेनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत हे रशियाने लक्षात घ्यायला हवे. देशाच्या सीमेवरून आपले सैन्य रशियाने माघारी बोलवावे असे आवाहनही या नेत्यांनी केले आहे. युक्रेन च्या अध्यक्षांना भेटण्याची तयारी पुतीन यांनी दर्शविली असल्याचे समजते. त्याचबरोबर पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही भेटण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी युक्रेनमध्ये रशिया लष्करी हस्तक्षेप करत असल्याचा इन्कार केला आहे.

Leave a Comment