युवराजच्या वडिलांनाही घशाचा कॅन्सर

yograjsingh
भारतीय क्रीकेट टिमचा आधार आणि कॅन्सरशी यशस्वी झुंज दिलेला झुंजार खेळाडू युवराजसिंग याचे वडील योगिराज सिंग यांनाही घशाचा कॅन्सर झाल्याचे वृत्त आहे. दोन महिन्यापूर्वीच त्यांना घशात दुखण्याचा आणि श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तपासणीत त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढील उपचारही तेथेच सुरू आहेत.

योगिराज सिंग हे स्वतःही कसोटी पटू आहेत. भारताकडून त्यांनी क्रिकेट कसोटी सामने खेळले आहेत.तसेच ते अभिनेतेही आहेत. भाग मिल्खा भाग चित्रपटात त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका केली आहे.

Leave a Comment