फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी करणार पांडाची पिले

panda२०१० साली जर्मनीत झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपबाबत अनेक अचूक भविष्ये वर्तविणारा पॉल हा आक्टोपस मृत्यू पावल्यानंतर आता यावर्षी होत असलेल्या फुटबॉल सामन्यांची भविष्यवाणी चीनमधील पांडाची पिले करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चिनी लोकांनी पांडाच्या पिलांचा या भविष्यवाणीसाठी उपयोग करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी टोपलीत विविध प्रकारचे खाणे बेबी पांडासाठी ठेवले जाणार आहे. त्यातील कोणत्या खाद्यपदार्थांना पांडा पसंती देतो त्यावर कोणती टिम जिंकणार हे ठरविले जाणार आहे. पांडा काय खातो यावर विजय , पराभव आणि ड्रा भविष्यवाणी ठरविली जाणार आहे.

नॉकआऊट राउंडची वेळ आल्यास झाडावर लावलेल्या झेंड्यातून कोणता झेडा पांडा निवडतो त्यावर कोणती टीम जिंकणार याचे भविष्य ठरविले जाणार आहे.

Leave a Comment