नेतृत्व गुण म्हणजे काय ?

boss
नोकरी मिळवताना आणि विशेषत: तिच्यात बढती मिळवताना नेतृत्व गुणाला सर्वाधिक महत्त्व असते. काही वेळा तर आपण काम करीत असलेल्या व्यवसायातील तांत्रिक कौशल्यापेक्षाही नेतृत्व गुणाला महत्त्व दिले जाते. यामागे काही कारणे आहेत. एकवेळ कौशल्य कमी असले तरी चालेल पण अंगी नेतृत्वगुण असतील तर असा अधिकारी अंगी कौशल्य असणारांना योग्य ते मार्गदर्शन करून आणि प्रेरित करून त्याच्याकडून कौशल्याचे मोठे काम करून घेऊ शकतो. म्हणून त्याच्या नेतृत्वगुणाला महत्त्व दिले जाते.

नेतृत्वगुण म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न अनेकदा विचारला जात असतो. त्याचे नेमके उत्तर मिळत नाही पण मनुष्यबळ विकास खात्यात काम करणारे काही जाणकार त्याचे योग्य उत्तर देतात. साधारणत: धाडसीपणा आणि कोणत्याही पेचप्रसंगात स्वत:हून पुढाकार घेण्याची तयारी यांना नेतृत्वगुण मानले जाते. चांगल्या नेत्याला हे गुण आवश्यकच असतात पण तेवढे पुरेसे नाहीत. हे दोन गुण तर इतर अनेक गुणांतले दोन दुय्यम गुण असतात. नेतृत्वगुणात सर्वाधिक महत्त्व असते ते चारित्र्याला. उत्तम चारित्र्यवान माणसाविषयी आपल्या कामगारांत एक विश्‍वासार्हता निर्माण झालेली असते. तो आपल्याला ङ्गसवणार नाही, तो आपले हेतुत: खच्चीकरण करणार नाही. आपली चूकही दाखवील आणि योग्य काम केल्यास बक्षिसही देईल अशी खात्री त्याच्या हाताखाली काम करणारांना वाटत असते. त्यातूनच तो दाखवील त्या मार्गावरून चालण्याची त्यांची तयारी होते आणि नेत्याला काही काम करून दाखवता येते.

नेत्याच्या अंगी सर्वांपेक्षा काही वेगळे गुण असतातच पण तो संकटाच्या प्रसंगात तसेच पेचप्रसंगात कसा वागतो यावरही त्याचे नेतृत्व कौशल्य अवलंबून असते. सामान्य लोक अशा प्रसंगात गांगरून जातात आणि नेमके काय करावे याचा संभ्रम निर्माण झाल्याने ते चुकीचे काही तरी करून बसतात. त्यातून त्यांचेही नुकसान होते आणि कंपनीचेही नुकसान होते पण चांगला नेता हा गांगरून जात नाही. तो धीर गंभीरपणे वागतो आणि संयमाने वागून त्याही स्थितीत योग्य तो निर्णय घेतो. केवळ पेचप्रसंगातच नाही तर एरवीही तो कसा वागतो याला नेतृत्वात ङ्गार महत्त्व असते. नोकरीत प्रगती करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारांनी आपल्या नेतृत्व गुणांचा अभ्यास केला पाहिजे.

Leave a Comment