उष्मांक घटविणारे कपडे

न्यूयॉर्क – कमीत कमी कॅलरीचे अन्न खाल्ल्याने प्रकृती छान राहते, म्हणून आहारातील उष्मांकाचे नियंत्रण करण्याची मोठीच कटकट सर्वांच्या मागे लागलेली असते. त्यासाठी खाण्याची पथ्ये पाळावी लागतात. परंतु अमेरिकेत असा एक वेष तयार करण्यात आला आहे की, जो परिधान केला असता अन्नातील जादा उष्मांक जळून जातात.

हा वेष परिधान करून थोडा वेळ चालणे, पायर्‍या चढणे, पायर्‍या उतरणे अशी कामे केली की, शरीरामध्ये जादा झालेले उष्मांक जळून जातात. या कपड्यांना स्कीनसियॉलॉजी असे म्हणतात आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेतील संशोधकांनी विकसित केला आहे.

हे कपडे घालून चालायला लागलो की, त्यांचा शरीराशी असा काही संबंध येतो की, त्यामुळे स्नायू आपोआप बळकट व्हायला लागतात आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते. या आगळ्या वेगळ्या कपड्यांच्या चाचण्या सुद्धा घेण्यात आल्या आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment