शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे पाच मार्ग

baby
नवी दिल्ली – बैठी कामे आणि मानसिक तणाव यामुळे जगातल्या पुरुषांच्या शुक्राणूंचा जोम आणि संख्या या दोन्हीवरही गंभीर परिणाम झाला असून तो जगातला सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. अर्थातच त्यामुळे ही समस्या कशी सोडवावी यावरही अनेक संशोधक संशोधन करायला लागले आहेत. अशा संशोधनातूनच शुक्राणूंचा जोम आणि संख्या वाढवण्याचे पाच मार्ग सापडले आहेत. मँचेस्टर विद्यापीठात यावर संशेाधन करण्यात आले आहे.

लायकोपीनचा वापर – आपल्या अन्नात लायकोपीन या द्रव्याचा वापर वाढला तर शुक्राणुंची संख्या व दर्जा वाढण्यास मदत होते असे अनुभव आहे. जगभरात झालेल्या १२ प्रकारच्या संशोधनात तसे आढळून आले आहे. लायकोपीन हे लाल रंगाच्या अन्न द्रव्यांत मोठ्या प्रमाणावर असते. म्हणून लाल टोमॅटो, स्ट्रॉ बेरी, गाजर, बीट, चेरी यांंचे सेवन करावे. लाल भाज्याही खाण्यास काही हरकत नाही. त्यामुळे शुक्राणुंची संख्या ७० टक्क्यांनी वाढते.

लॅपटॉपपासून दूर रहा – जर्नल ऑफ फर्टिलिटी अँड स्टरिलिटी या मासिकांत २०११ साली करण्यात आलेल्या एका प्रयोगाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्राणूंची घटती संख्या आणि लॅपटॉपचा वापर यांच्यात काहीतरी संबंध असल्याचे आढळून आले आहे. तेव्हा लॅपटॉप पासून दूर राहिल्यास शुक्रांणूंची संख्या वाढते. विशेषत: वाय फाय पासून दूर राहिले पाहिजे. मोटार सायकल घातक – स्पेनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीत असे आढळून आले आहे की मोटार सायकलवर अधिक काळ प्रवास करणारांच्याही शुक्राणूंची संख्या कमी होत असते. तेव्हा मोटार सायकल टाळली पाहिजे.

तापमानाचा परिणाम – शुक्राणूंची संख्या आणि तापमान यांचाही संबंध आहे. ३४. ५ अंश सेल्सीयस तापमानापेक्षा अधिक तापमानात ते कमी होतात म्हणून अधिक तापमानात वावरू नये. ३० अंश सेल्सीयसच्या पुढे तापमान गेल्यास त्या तापमानात बाहेर पडू नये. कॉफीचा परिणाम – कॉफी पिण्यास हरकत नाही पण जास्त कॉफी पिल्यानेही शुक्राणूंवर गंभीर परिणाम होतो. तेव्हा अती कॉफीपान टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment