मुलांच्या राजकीय ‘करिअर’साठी दत्ता मेघे भाजपच्या वाटेवर ?

dattameghe
नागपूर – कॉंग्रेसचे जेष्ट नेते आणि काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीशी फारकत घेतलेले दत्ता मेघे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे.विशेष म्हणजे मुलांच्या राजकीय ‘करिअर’साठी ते भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. चार वेळा खासदार म्हणून निवडूण आलेल्या दत्ता मेघे यांना सध्या काँग्रेसमध्ये नाराजीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. मात्र, काही वर्षांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. यामुळे सुधीर मेघे आणि सागर मेघे या आपल्या दोन मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचेही समजते.भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने मेघे भाजपमध्ये प्रवेश करण्यार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Comment