प्रसाद थरिकुटुम यांचा इन्फोसिसला रामराम

prasad
इन्फोसिसचे ग्लोबल हेड ऑफ स्ट्रॅटिजिक सेल्स अॅन्ड मार्केटिंग प्रसाद थरिकुटुम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. यामुळे इन्फोसिसमधून बाहेर पडणार्‍या वरीष्ठ अधिकार्‍यांची संख्या ११ वर गेली आहे. गेल्या जूनमध्ये नारायणमूर्ती यांनी इन्फोसिसची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर सुरू झालेले राजीनामा सत्र अजूनही सुरूच राहिले आहे.

इन्फोसिसमधून नुकतेच बाहेर पडलेले बी.जी श्रीनिवास यांच्यापाठोपाठ प्रसाद यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही १९ वर्षे कंपनीत काम केले आहे. प्रसाद हे इन्फोसिसमध्ये यूएसमधील रिजनल हेड ऑप बिझिनेस मॅनेजमेंट म्हणून १९९५ साली रूजू झाले होते. त्यांच्या कामाचा चार्ज अध्यक्ष व बोर्ड मेंबर व्हीबी प्रवीणराव यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचेही समजते.

Leave a Comment