अमेरिकेतील नेवार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला लिफटवाहक ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात विमानाचे बरेच नुकसान झाले असल्याचे समजते. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
नेवार्क विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ट्रकची धडक
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे बोईंग ७७७ नेवार्कहून मुंबईकडे निघाले होते. विमानाला रनवेवरच लिफ्टवाहक ट्रकची धडक बसली. विमानात ३२५ प्रवासी होते. धडक बसल्याने विमानाचे नुकसान झाले. विमानातील प्रवाशांना मुंबईला आणण्यासाठी दुसरे विमान पाठविले गेले असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. हे प्रवासी शुक्रवारी म्हणजे आज मुंबईत पोहोचतील असेही सांगितले जात आहे.