अमेझॉनचा थ्रीडी स्मार्टफोन १८ जूनला लाँच

3dmobile
अमेरिकेतील सर्वात मोठी शॉपिंग वेबसाईट असलेल्या अमेझॉनचा बहुचर्चित थ्रीडी स्मार्टफोन जूनच्या १८ तारखेला लाँच होणार असल्याची खबर आहे. गेल्याच महिन्यात अमेझॉन होलोग्राम नावाचा स्मार्टफोन लाँच करून लवकरच स्मार्टफोन बाजारात उतरत असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. अमेझॉनने मात्र याबाबत पूर्ण खुलासा अद्यापी केला नसला तरी तसे संकेत जरूर दिले आहेत.

या फोनसंबंधी अधिक कांहीही माहिती अजून प्रसिद्ध केली नसली तरी हा फोन मोशन सेन्सरसह असेल असे सांगितले जात आहे.अॅपल आणि सॅमसंगच्या स्पर्धेत हा फोन येत आहे. त्याला थ्रीडी इंटरफेससह मल्टीपल फ्रंट फेसिंग कॅमेरे असतील असेही सांगितले जात असून ही कंपनी मार्केटिंग सेलिंग मधील अग्रणी असल्याने या फोनचे लॉचिंग शाही थाटात केले जाईल असे समजते.

या फोनला थ्रीडी शॉपिंग फिचरही दिले जाणार आहे. म्हणजे अॅमेझॉनसाईटवर ज्या वस्तू विक्रीसाठी आहेत त्या वस्तूंची थ्रीडी इमेज युजर पाहू शकणार आहे. यात रेटीना ट्रकींग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला असल्याचे व त्यामुळे स्क्रीनवर डिस्प्ले होणारी कोणतीही प्रतिमा तरंगती दिसेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment