मुलाच्या चित्रकलेमुळे वडील अडचणीत

passport
मुलांमुळे पालक अडचणीत आल्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती असतात. नको तेथे नको ते बोलणे, आईवडिलांना तोंडघशी पाडणे, चार चौघात नको तेव्हा खरे बोलून पालकांची फजिती करणे हे प्रकार जगभरात सगळीकडे सारखेच असतात. मात्र मुलाच्या चित्रकलेमुळे वडील अडचणीत आल्याचे प्रकार तुरळकच घडतात.

चेन हे चीनी गृहस्थ आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी दक्षिण कोरिया गेले असताना हॉटेलमध्ये मुलाला ठेवून गेल्याची मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागली. कारण चेन यांचा पासपोर्ट हॉटेल रूममध्ये होता आणि या चिरंजीवांनी या पासपोर्टवरच आपल्या चित्रकलेची मोहर उठविली. मुलाने पासपोर्ट वर केवळ ढग, प्राणीच काढले नाहीत तर वडिलाच्या फोटोला दाढीमिशा काढल्या , त्यांचे विरळ केस दाट केले. ही सारी चित्रकला काळ्या शाईच्या पेनने त्याने केली. परिणामी ते जेव्हा मायदेशी जाण्यासाठी सोल विमानतळावर आले तेव्हा तेथील सिक्युरिटी क्लिअरन्स मिळू शकला नाही. त्यांचा पासपोर्ट तेथील अधिकार्‍यांनी नाकारला. हा सारा प्रकार चेन यांनी सोशल साईट विबोवर टाकला आणि मदतीची याचना केली.

आता चेन यांचे कुटुंब आणि हे पराक्रमी चिरंजीव मायदेशी परतले आहेत. चेन मात्र अजूनही दक्षिण कोरियातच अडकून पडले आहेत.

Leave a Comment