मुंबई शेअर बाजार निर्देशांक १ लाखांवर जाणार

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक येत्या सहा वर्षात म्हणजे २०२० पर्यत १ लाखाची पातळी गाठेल असा अंदाज कार्वी स्टॉक ब्रोकिगच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालानुसार नव्याने सत्तेवर आलेले मोदी सरकार पायाभूत ढाचांत वेगाने सुधारणा करण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे कंपन्यांच्या महसूलात २० ते २५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. परिणामी शेअर बाजाराचा निर्देशांकही वाढणार आहे. मुंबई शेअर बाजारात ३० शेअरवाला निर्देशांक आत्ताच २५ हजाराच्या पातळीवर आहे. त्यात आणखी तेजी होण्याची शक्यता फारच मोठी आहे. सध्या विदेशी संस्थांकडून भारतीय बाजारावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक केली जात आहे. २०१३ मध्ये ही गुंतवणूक २० अब्ज डॉलर्स इतकी होती. चालू वर्षात त्यात १५ टक्के वाढ होईल असे संकेत मिळत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment