महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर घटला

maha
मुंबई – गेल्या दशकात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीच्या दरात ६.७४ टक्के घट नोंदविली गेली आहे. देशातही लोकसंख्या वाढीचा दर घटला असला तरी महाराष्ट्रात हा दर देशाच्या तुलेनेत दुपटीने घटला असून तो आता १६ टक्कयांवर आला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच लोकसंख्या वाढीत इतकी घट नोंदविली गेली आहे. हा अहवाल विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवला गेला आहे.

२००१-२०११ या काळात संपूर्ण देशात लोकसंख्या वाढीच्या दरात ३.८ टकके घट झाली असून महाराष्ट्रात ती ६.७४ टक्के आहे. २०१३-१४ साठी केल्या गेलेल्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात ही बाब निदर्शनास आली आहे. याच सर्वेक्षणात राज्याचे दरडोई उत्पन्न ८.७ ट्के राहील असा अंदाज वर्तविला गेला असून कृषी व संबंधित क्षेत्रात ४ टक्के वाढीची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. मात्र सहकारी आणि सरकारी दूध डेअरी व मासे उत्पादनात घट दर्शविली गेली आहे. महिला पुरूषांचे प्रमाण नागपुरात सर्वाधिक असून हे प्रमाण १ हजारी पुरूषांमागे ९६४ इतके असून कोकणांत ते सर्वात कमी म्हणजे १ हजारी ८९४ इतके आहे.

Leave a Comment