१३ वर्षांखालील मुलेही फेसबुक अकौंट उघडू शकणार

fb
१३ वर्षांखालील मुलांना फेसबुक अकौंट उघडण्यास असलेली बंदी आता यापुढे राहणार नाही. १३ वर्षांखालील मुलेही मित्रांशी कनेक्ट होण्यासाठी फेसबुक अकौंट उघडू शकणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक ठरणार आहे. फेसबुकने या संदर्भात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे पेटंटसाठी अर्ज केला आहे. त्यानुसार पालकांची परवानगी आहे तोपर्यंत मुले फेसबुक अकौंटचा वापर करू शकणार आहेत.

यासाठी १३ वर्षांखालील मुलांना अकौंट ओपन करताना आपल्या पालकांचा अकौंट तपशील द्यावा लागणार आहे तसेच पालकांचे अकौंट उघडण्यासाठी ऑथरायझेशन घेतले जाणार आहे. पालकांचे फेसबुक अकौंट पाहून पालक मुलांचे नाते असल्याची खात्री करून घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे मुलाच्या वयाचीही खात्री करून घेतली जाणार आहे. व्हेरिफिकेशन नंतरच मुलांचे अकौंट सुरू होऊ शकणार आहे. शिवाय हे अकौंट पालकांच्या अकौंटशी लिंक केले जाणार आहे. यामुळे मुले नक्की काय शेअर करतात आणि मुलांची वर्तणूक यावर पालक लिमिटेशन आणू शकणार आहेत. अर्थात यातही मुलांची प्रायव्हसी अबाधित राहील याची काळजी घेतली जाणार आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment