मोदी – ओबामा भेट २६ सप्टेंबरला

modi
वॉशिग्टन – अमेरिकन सरकारचे अमेरिका भेटीचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून २६ सप्टेंबरला मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटणार असल्याचे वृत्त आहे. आपल्या शपथविधीसाठी सार्क देशाच्या प्रमुखांना निमंत्रण देऊन मोदींनी सर्व जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यापाठोपाठच परदेशाबाबतच्या धोरणाचा हा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला असल्याचे जाणकारांचे मत आहे.

युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये न्यूयॉर्क येथे २६ सप्टेंबरलो मोदी भाषण करणार आहेत. त्याच दिवशी ते बराक ओबामा यांना भेटतील असे समजते. जगातील दोन मोठ्या लोकशाही देशप्रमुखांच्या या भेटीबाबत जगभरातून उत्सुकता आहे. ओबामा आणि मोदी यांच्यात बैठक होणार असून त्यात भारत अमेरिका स्ट्रॅटिजिक पार्टनरशीप अधिक मजबूत करण्याच्या दिशेने कांही पावले टाकली जातील असे सांगितले जात आहे.

२००२ च्या गुजराथ दंग्यानंतर नरेंदा्र मोदींना अमेरिकेने व्हीसा नाकारला होता. आता मोदी पंतप्रधान असल्याने त्यांना एवन व्हिसा लागू होत आहे. ओबामांनी मोदी पंतप्रधान बनल्यापासून लगेचच मोदी सरकारबरोबर काम करण्याची अमेरिकेची तयारी असल्याचे जाहीर केले होते.