दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई – आर. आर .पाटील

patil_6
मुंबई – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी दगडफेक करणाऱ्या घटनेची मुंडे यांच्या कन्येने ,आमदार पंकजा मुंडे -पालवे यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीनुसार तपास करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. मुंडेंच्या अंतिम संस्काराला दगडफेक करणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. तसेच यावेळी हिसंक झालेल्या जमावाने पोलिसांच्या गाड्याही जाळल्या होत्या. यावेळी मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी जमावाला शांत राहण्याचे भावनिक आवाहन करत परिस्थिती काहीशी नियंत्रणात आणली होती. यानंतर मुंडेंच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या हिंसेची चौकशी करण्याची मागणी पंकजा यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुमारे २५ जणांना ताब्यात घेतले आहे. पंकजांच्या मागणीनुसार आज गृहमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment