संरक्षण मंत्रालयाकडून ५० हजार कोटींची राफेल विमान खरेदी

rafal
दिल्ली – देशाचे संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालय शतकातील सर्वात मोठी खरेदी करण्याचा करार तीन महिन्यात फायनल करणार आहे. या खरेदीत ५० हजार कोटी रूपयांची १२६ राफेल ही फ्रान्सची लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. गेले तीन दिवस या विमानांबरोबर भारतीय वायुदलाचा संयुक्त सराव जोधपूर येथे सुरू आहे. गरूडझेप ५ या नावाने हा सराव केला जात आहे.

राफेल विमाने ही मल्टी रोल कॉम्बॅट विमाने भारतीय वायुदलातील वरीष्ठ अधिकार्‍यांच्या पसंतीस आली आहेत. या खरेदीअंतर्गत अशी १२६ विमाने भारताला फ्रान्सकडून विकली जाणार आहेत. त्यातील पहिली १८ विमाने २०१६ साली मिळतील तर बाकी १०८ विमाने भारतातच असेंबल केली जाणार आहेत. ही विमाने भारतीय वायुदलाच्या मिग श्रेणीतील १२० विमानांना रिप्लेस करणार आहेत. एका राफेल विमानाची किंमत ३७० कोटी रूपये आहे.

Leave a Comment