बॉम्बशेलमध्ये फुलविली फुलबाग- शांततेसाठी दिला अनोखा संदेश

flower
पॅलेस्टीन – पॅलेस्टीन आणि इस्त्रायल यांच्यातील दुश्मनी दिवसेनदिवस उग्र रूप धारण करत असतानाच एका पॅलिस्टीनी महिलेने शांती संदेश देण्यासाठी अनोखा मार्ग चोखाळला आहे. या महिलेने बिलीन गावात एक बगिचा फुलविला असून सुगंध देणार्‍या फुलांच्या रोपांसाठी तिने चक्क अश्रूधुरासाठी इस्त्रायल व पॅलेस्टीनी यांनी जे बॉम्ब वापरले त्या रिकाम्या बॉम्बशेलचाच कुंड्यांसारखा वापर केला आहे.

हे सर्व ग्रेनेड इस्त्रायली सैनिक आणि पॅलेस्टीनी स्थानिकांनी एकमेकांविरोधात वापरले आहेत. त्याच जमिनीवर ही सुगंधी फुले द्वेषाचा अंगार विझवून सुगंध पसरवित आहेत. जेथे हा बगिचा उभारला गेला आहे ती जमीन विवादित आहे. पॅलेस्टीनींच्या मते ही जमीन त्यांची आहे तर इस्त्रायलच्या मते ही जमीन त्यांची असून त्यांनी तेथे संरक्षण भिंत उभारली आहे. या दोन देशात गेली कित्येक वर्षे सातत्याने युद्ध सुरू असून त्यात दोन्ही देशांच्या लक्षावधी नागरिकांचे प्राण गेले आहेत.

Leave a Comment