भारतात महिलांवरील अत्याचार ;अमेरिका चिंताग्रस्त

rapecase
वाशिंग्टन – भारतात महिलांवर होणार्या अत्याचारावरून अमेरिकेत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील बदाऊमध्ये मागिल आठवड्यात दोन दलित तरुणींवर बलात्कार करुन, त्यांची अत्यंत क्रूर पध्दतीने हत्या करण्याच्या घटनेप्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील उफ प्रवक्ता मेरी हार्फ यांनी चिंता व्यक्त केली आहे ,त्या म्हणाल्या आम्ही पिडीतांच्या परिवारासोबत आहोत.

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेले महिलांवरील लैंगिक शोषणासंदर्भातील गुन्हे, बलात्कार, छळ, हत्या आणि अत्याचाराने व्यतिथ आहोत . त्याचबरोबर महिला अत्याचाराविरोधात कार्य करणा-या व्यक्ती, शासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे कौतुक केले आहे. लोकांबरोबर भेदभाव होत असेल, त्यांचे शोषण होत असेल तर हे अत्याचार वाढतच जाणार आहे . यासाठी कायदे आणि विचारांमध्ये बदल होण्यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांवर होणा-या अत्याचाराविरोधात काम करणा-या भारतातील विविध सामाजिक आणि सरकारी संस्थांबाबत ओबामा सरकार संतुष्ट असल्याचे आणि अशा संस्थांचे अमेरिका कौतुक करत असल्याचे त्या म्हणाल्या.