दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी हाशिम अमला

hashim
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार स्मिथने मार्चमध्येय निवृत्ती जाहीर केली होती. त्यायमुळे आागमी काळात कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.आगामी काळात होत असलेल्याध श्रीलंकेच्या दौ-यात हाशिम अमला दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण अपिफ्रेकेचा संघ २ कसोटी सामने तसेच ३ वनडे खेळणार आहे.

त्यािसोबत आगामी काळात वनडेत दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व डिव्हिलीयर्स करणार आहे पण कसोटीत मात्र तो उपकर्णधार असेल. दक्षिण आफ्रिका वनडे संघात अनुभवी कॅलिसचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी ग्रॅम स्मिथने विक्रमी १०१ कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. त्यायच्या जागी आता हाशीम आमलाची निवड करण्याधत आली आहे.

आगामी काळात कसोटीसाठी निवडण्याआत आलेला दक्षिण आफ्रिका कसोटी संघ पुढीलप्रमाणे: अल्विरो पीटरसन, डिन एल्गर, हाशिम अमला (कर्णधार), ड्यू प्लासिस, डिव्हिलीयर्स, ड्युमिनी, व्हॅन झील, फिलँडर, मॉर्ने मॉर्केल, डेल स्टेन, इम्रान ताहिर, अबॅट, डि कॉक, डेन पीट्ड वनडे संघ : डिव्हिलीयर्स (कर्णधार), अमला, डी कॉक, कॅलिस, डयुमिनी, मिलर, वेन पार्नेल, मॅकलरेन, स्टेन, मॉर्ने मॉर्केल, इम्रान ताहिर, फिलँडर, डयू प्लासिस, हेन्ड्रिक्स, फॅसिंगो.

Leave a Comment