… आणि कार्यकर्ते शांत झाले !

munde4
परळी – लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता,मात्र प्रचंड उसळलेल्या जनसागरात ते शक्य नसल्याने भावूक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच राग काढला. भावनाविवश झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पंकजा मुंडे यांनाच आवाहन करावे लागले. मुंडेंच्या पार्थिवाला फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून परळीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात आणण्यात आले. यावेळी उसळलेल्या जनसागराला आपल्या लाडक्या नेत्यांचे अंतिम मुख दर्शन घेता यावे यासाठी ठेवण्यात आले मात्र, उपस्थित प्रत्येकालाच मुंडेंचे दर्शन घेता येणे शक्य नसल्याने भावनेच्या भरात कार्य़कर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यावेळी पंकजा मुंडे-पालवे यांनी कार्य़कर्त्यांना भावनिक आवाहन करत कार्य़कर्त्यांना शांतता ठेवण्यास सांगितले.कार्य़कर्तेही पंकजा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांत झाले.

Leave a Comment