स्नोडेनने ब्राझीलकडे आश्रयासाठी केली विनंती

snowden_2
अमेरिकेच्या हेरगिरीचा पर्दाफाश करणार्यान राष्ट्रीय संरक्षण संस्थेतील कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने ब्राझील मध्ये आश्रय मिळावा यासाठी अर्ज केला असल्याचे ब्राझील मधील ग्लोबो टिव्हीवर मुलाखत देताना सांगितले आहे. ब्राझीलबरोबरच त्याने अन्य देशांशीही याबाबत संपर्क साधला असला तरी ब्राझीलमध्ये राहण्यात आपल्याला समाधान वाटेल असेही त्याने स्पष्ट केले आहे.

स्नोडेनने अमेरिकेचे गुपित फोडल्यानंतर अमेरिकेतून पलायन केले आहे. सध्या तो रशियात आश्रयास असून ही मुदत ऑगस्टमध्ये संपते आहे.. अमेरिकेने स्नोडेनचा पासपोर्ट रद्द केला आहे. स्नोडेन अमेरिकेत परतला तर त्याला जन्मठेपेचे शिक्षा होऊ शकते. यामुळे स्नोडेनकडे सध्या खूपच कमी मार्ग उपलब्ध आहेत. मात्र तरीही कोणत्याही देशाने आश्रय दिला तरी त्याच्याबदल्यात त्याच्याकडे अद्यापीही असलेली आणि प्रसिद्ध न झालेली अनेक गुप्त कागदपत्रे संबंधित देशाला देणार नसल्याचे स्नोडेनने स्पष्ट केले आहे. आपल्याला आश्रय दिला गेला तर तो माणुसकच्या भावनेनेच दिला जावा असे त्याचे म्हणणे आहे.

Leave a Comment