अखेरचे अधिवेशन … चार महिन्यांनतर आमचेच सरकार !

vidhansabha2
मुंबई – महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सकाळी राज्य मंत्रिमंडळात दोन नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात विरोधकांनी लोकसभेत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचा आनंद जल्लोषात साजरा केला.यात भाजपचे विनोद तावडे, आमदार तारासिंह हे फारच आघाडीवर होते. चार महिन्यांनतर आमचेच सरकार या अविर्भावात विरोधक वावरत होते.

लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या, त्यात महायुतीने मोठे यश मिळवले. आता चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठा आत्मविश्वास संचारला आहे . त्यात विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन. त्यामुळे सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी चांगलाच ‘गृहपाठ’ केल्याचे दिसून आले. चार महिन्यांनतर आमचेच सरकार येणार असल्याच्या थाटात महायुतीचे नेते वावरत होते. अधिवेशनाच्या कामकाजाला पश्नोत्तरांच्या तासाने सुरुवात झाली. यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार खंडाजगी झाली,त्यात खडसे यांनी राणे यांना जेरीस आणले.

Leave a Comment